
🕉️🛕धर्म पिठ महिला आघाडीने अमरावती येथे केले सावित्रीबाई फुले यांना अभिवादन🕉️🛕
ज्यांच्या मुळे महिलांना शिक्षणाची दारे उघडी झाली त्या प्रथम महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांना धर्म पिठाच्या अहिल्येच्या लेकीनी जयंती दिनी विविध कार्यक्रम राबवून अभिवादन केले.
धर्म पिठ महिला राज्य अध्यक्ष सौ.शारदाताई ढोमने, अमरावती जिल्हा अध्यक्ष सौ.छबुताई मातकर,विदर्भ संघटक सौ.प्रतिभाताई इसळ, अमरावती जिल्हा महिला उपाध्यक्ष जयश्रीताई वाघ, नंदाताई अवघड ,डॉ हर्षदाताई मातकर,अहिल्याताई अवघड, कुसुमताई इसळ व समाजभगिनी सहभागी झाल्या होत्या.याप्रसंगी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करून विविध वक्त्यांनी सावित्रीबाईंच्या कार्याचा गौरव केला. सावित्रीबाईंनी त्या काळात पुढाकार घेतला, घराबाहेर पडल्या म्हणून आज देशातील व महाराष्ट्रातील महिला सर्व क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत याची जाणीव वक्त्यांनी करून दिली.