💐आदिवासी धनगर साहित्य संमेलनाचा आज पाचवा वर्धापन दिन.🎂💐

📚🖋️7 जानेवारी,आदिवासी धनगर साहित्य संमेलनाचा आज पाचवा वर्धापन दिन.🖊️📚

आजपासून बरोबर पाच वर्षे आधी दि.7जानेवारी 2017 रोजी धनगर समाजाचे पहिले साहित्य संमेलन सोलापूर येथे भरले होते.आज त्याचा पाचवा वर्धापन दिवस आहे.

रानावनात फिरणाऱ्या व विकास कुठे राहतो हे माहिती नसलेला समाज आपले साहित्य संमेलन भरवतो हाच एक मैलाचा दगड ठरावा.डॉ. अभिमन्यू टकले व त्यांच्या सहकाऱ्यांनी वर्षोनुवर्षे पाहलेले स्वप्नं 7जानेवारी 2017 रोजी पूर्ण झाले. गाव करी ते राव ना करी असाच काही अनुभव या साहित्य संमेलनातून दरवर्षी पहायला मिळतो.
समाजात सुशिक्षित व उच्च शिक्षित लोकांची संख्या दरवर्षी वाढत आहे.या सर्व धनगर सारस्वतांची साहित्यिक भुक भागविण्याचे काम साहित्य संमेलनाने केले असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
साहित्य संमेलनामुळे माझ्या सारखे माणसं लिहायला लागली,समाजच लिहायला लागला. संमेलनामुळे नागपूरचा माणूस सोलापूरच्या संपर्कात आला तर चांदा ते बांदा समाज चळवळीत एकत्र आला, संघटीत होऊ लागला याचे श्रेय साहित्य संमेलनाला जाते ही संमेलनाची फलनिष्पत्तीच म्हणावी लागेल.एका पिक्चर मध्ये डायलॉग आहे “मेरे पास माँ है ,तसा आज समाज म्हणू शकतो आमच्याकडे साहित्य संमेलन आहे.ज्यांना कधीही प्रस्थापित यंत्रणेने व्यासपीठ दिले नाही त्या साहित्यकांना आदिवासी धनगर साहित्य संमेलनाच्या माध्यमातून हक्काचे व्यासपीठ निर्माण झाले व समाजा करिता साहित्यिक, शैक्षणिक प्रगतीचे दारे उघडली म्हणायला हरकत नाही.

समाजाने 2017,2018 व 2019ची साहित्य संमेलने एका पेक्षा एक वरचढ पद्धतीने पार पाडली व 2020चे सांगोला येथे होणारे संमेलन कोविद-19 मुळे तात्पुरते स्थगित आहे ते लवकरच सांगोला येथेच होईल.आज महाराष्ट्रातील किमान अकरा ठिकाणचे समाजबांधव साहित्य संमेलन आमच्या जिल्ह्यात घ्या म्हणून मागणी करु लागले.हा बदल म्हणजे साहित्य संमेलनाने समाजमनात ठासून भरलेला आत्मविश्वासच आहे.समाजात हे शिवधनुष्य पेलण्याची हिम्मत तयार झाली.
साहित्य संमेलनाची दुसरी फलनिष्पत्ती म्हणजे “धर्म पिठाची”स्थापना.समाज शिक्षण,समाज प्रबोधनातून समाजाचा सर्वागीण विकास साधन्यासाठी निर्माण झालेले अराजकीय व्यासपीठ म्हणजे धर्मपिठ.आपल्या चालीरीती, परंपरा, देवधर्म ,आपला ईतिहास याचे संवर्धन करत समाजातील शाखा भेद मिटवणे,सोलापूर ते नागपूर सर्व समाज एका माळेत गुफून रोटी-बेटी व्यवहार सुरू करणे ईत्यादी धैय धोरणे धर्म पिठाच्या माध्यमातून राबवायचे नियोजन आहे.धर्म पिठ हे साहित्य संमेलनाचे विस्तारित अंग आहे.साहित्य संमेलन पाया आहे तर धर्मपिठ कळस ठरावे.
आज 7जानेवारी रोजी समाज चळवळीचा पाया साहित्य संमेलनाच्या माध्यमातून रोवला गेला होता. आज या वर्धापन दिनी पायरीच्या बुलंद चिरेला पाचव्या वर्धापन दिनानिमित्त अभिवादन करुया.🌹

✍️ विनायक काळदाते
माजी सचिव
पहिले आ.धनगर साहित्य संमेलन,(2017)सोलापूर.

साहित्य., सोलापूर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *