💐अत्यंत साध्या पद्धतीने अकोट येथील वधुवर परीचय पुस्तिकेचे प्रकाशन👌

📚🌹दिखाऊपणाला नाही दिला वारा -पुस्तिका प्रकाशनाला मोजक्यानांच थारा🌹

अहंकाराचा वारा न लागो राजसा।
माझिया विष्णुदासा कार्यकर्त्यांशी l या संत उक्तीप्रमाणे अत्यंत साधेपणाने,कुठल्याही जाहिरातबाजी व बडेजावाशिवाय एका तपाची पार्श्वभूमी असलेल्या अकोट येथील वधुवर परीचय मेळाव्याच्या बायोडाटा पुस्तिकेचे विमोचन/प्रकाशन झाले.
कोरोना रोगराई मुळे सरकार एकत्र येण्यावर,गर्दी जमवण्यावर बंदी असतांना आयोजकांनी गर्दीलाच थारा दिला नाही.
आयोजकांनी स्वयंशिस्त पाळत मोजक्या लोकांमध्ये ,समाजाला उपयुक्त ते देण्याचा यशस्वी प्रयत्न केला व कोरोना काळात स्वताच्या आचरणातून समाजाला वळण लावण्याचा पायंडा पाडला.
समाजाला वळण लावायचे तर ते कर्त्या माणसांनी स्वतापासुण लावले पाहिजे हे सांगताना राष्टसंत म्हणतात
आम्हास वाटे गाव सुधारावे l परि सांगा त्यासाठी काय करावे? याचे उत्तर सुद्धा त्यांनीच दिले ते असे “सर्वाआधी एक निश्चय lलोक असती अनुकरप्रियl विशेष दिसे ती घेती सोय lन सांगताही l
आयोजन समिती सुशिक्षित लोकांची आहे त्यामुळे वरील मार्ग त्यांनी अवलंबला असावा.
चारित्र्यवान लोकांचे अनुकरण समाज करत असतो,पाहत असतो “मुख्य कार्यकर्त्यांची राहणी l निरोक्षोणी बघती कोणी l लागती त्याच्याच मागे धावोनी l आयोजन समितीने समाजप्रबोनाच्या हेतूने आपली कार्यपद्धती अवलंबली व समाजाला उपयुक्त असे देण्याचा प्रयत्न नम्रपणे केला हे उल्लेखनीय आहे,प्रशंसनिय आहे.
म्हणोनि कार्यकर्त्यात असावे आकर्षण lसेवाचारित्र्यांचे ओजपूर्ण lसुधार नोहे त्यावांचून l गावाच्या कोण्या ll या पद्धतीने ,सेवाभावाने वागण्याचा आटोकाट प्रयत्न समितीमधील सदस्य करतांना दिसतात ,त्यामुळे ते समाजाचे आकर्षण ठरत आहेत व वधुवर परिचय मेळावा महाराष्ट्राचे माँडेल ठरताना दिसत आहे.
समाज उपयोगी कामाचा,चांगल्या कामाचा गौरव झाला,वाहवा झाली की माणसाला अहंकार येतो,विनयशिलता हरवून बसतो याची जाणीव ठेवून “अंहकाराचा वारा न लागो राजसा lमाझ्या विष्णुदासा कार्यकर्त्यांशीl हा नियम पाळल्यामुळे मेळाव्याचे भविष्य उज्वल आहे.
पदरमोड करून,खर्चात बचत करून आयोजन समिती नांव नोंदविलेल्यांना मोफत पुस्तिका उपलब्ध करून देणार आहे हे सुद्धा महाराष्ट्रात पथदर्शक आहे,प्रथमच घडते आहे.
आधी केले मग सांगितले या पद्धतीने वधुवर परिचय पुस्तिका समाजाला उपलब्ध करून दिल्याबद्दल समाजातर्फे आयोजन समितीचे आभार व पुढील वाटचालीस शुभेच्छा.🌹

✍️विनायक काळदाते, नाशिक.
https://scontent.fnag6-1.fna.fbcdn.net/v/t66.36281-6/10000000_404862344080075_4084954761306530488_n.mp4?_nc_cat=107&ccb=2&_nc_sid=985c63&efg=eyJ2ZW5jb2RlX3RhZyI6Im9lcF9zZCJ9&_nc_ohc=daTlQWmSPdAAX-o-i4k&_nc_ht=scontent.fnag6-1.fna&oh=563842f655b44f78b5ff4a6b6d69ec79&oe=60238D4D

Breaking News, अकोट, शुभविवाह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *