💐धर्म पिठाच्या शिरेपेचात अकोला जिल्हा अध्यक्ष श्री.होपळ सर यांनी खोचला मानाचा तुरा💐

📚🌹🕉️ धर्म पिठ अकोला जिल्हा अध्यक्ष श्री.होपळ सर यांनी धर्म पिठाच्या शिरेपेचात खोचला मानाचा तुरा 🕉️

मागील बारा तेरा वर्षांपासून अकोला जिल्ह्यात एक नाविन्यपूर्ण प्रयोग समाज राबवतो तो म्हणजे डिसेंबर महिन्यात उपवर वधुवर परिचय मेळाव्याचे आयोजन. आयोजन समिती दिवाळीच्या सुट्यांमध्ये गावोगांव फिरुन मुलामुलींचे बायोडाटा गोळा करतात व डिसेंबर महिन्यात अकोट जिल्हा अकोला येथे उपवर वधुवरांचा परीचय मेळावा होतो.या मेळाव्यात हे बायोडाटा पुस्तक स्वरूपात प्रसिद्ध करतात. या मध्ये कुठलेही शुल्क आकारल्या जात नाही.दरवर्षी तिन चार हजार पालक,वधु वर मुले मुली या मेळाव्याला हजर असतात. मुंबई पुणे येथे राहणारी मंडळी सुद्धा मेळाव्याला हजेरी लावतात, सात आठशे मुलामुलींचे बायोडाटा असलेले पुस्तक घेऊन मुलामुलींसाठी सोयरीक संबध पाहणे सुरु करतात. हा मेळावा महाराष्ट्रातील प्रथम मेळावा असून त्याला बारा पधरा वर्षाची परंपरा आहे.
धनगर धर्म पिठाचे अकोला जिल्हा अध्यक्ष श्री.रामदासजी होपळ सर व त्यांची टिम मागील एका तपापासून हे समाजकार्य करत आहेत.
यावर्षी लाँकडाउनच्या अडचणी असल्यामुळे व रोगराईचा प्रसार होऊ नये म्हणून मेळावा रद्द करून तिनशे मुले व चारशे मुली यांचे बायोडाटा असलेल्या पुस्तिकेचे प्रकाशन धर्म पिठ महिला राज्य अध्यक्ष सौ.शारदाताई ढोमने व त्यांचे पती,धर्म पिठाचे अमरावती जिल्हा अध्यक्ष श्री.ज्ञानेश्वरजी ढोमने यांच्या हस्ते दिनाक 12जानेवारी 2021 रोजी अकोट जि.अकोला येथे झाले.
आज काल मुला मुलींचे लग्न संबध जुडवून आणणे पालकांसाठी व नातेवाईकांसाठी जिकीरीचे झाले आहे.गावापासून नोकरीनिमित्त दूर राहणाऱ्यांसाठी तर अजूनच अडचणी येतात. परंतु वधुवर परीचय मेळावा व सात आठशे मुलामुलींचे बायोडाटा असलेले पुस्तक या द्वारे पालकांची अडचण दूर करण्याचा प्रयत्न या द्वारे श्री.होपळ सर व त्यांची टिम करत असते.
समाजाकडून कुठलीही वर्गणी किंवा नोंदणी फी न घेता हे समाजकार्य मागील तेरा चौदा वर्षांपासून सुरू आहे.
धर्म पिठासाठी अभिमानाची गोष्ट ही आहे की हा मेळावा व बायोडाटा पुस्तिका या साठी रात्रीचा दिवस करणारे श्री.होपळ सर हे धर्म पिठाचे अकोला जिल्हा अध्यक्ष आहेत व ज्यांच्या हस्ते हा प्रकाशन सोहळा पार पडला ते श्री.ज्ञानेश्वरजी ढोमने हे धर्म पिठाचे अमरावती जिल्हा अध्यक्ष आहेत व सौ.ढोमनेताई धर्म पिठाच्या महिला राज्य अध्यक्ष आहेत.
धर्म पिठा सोबत जोडलेली माणसं अनेक मार्गानी समाज शिक्षण,समाज प्रबोधन व समाज विकासात हातभार लावत आहेत,योगदान देत आहेत. त्यांच्या कर्तृत्वामुळे धर्म पिठाला सुद्धा नावरुप प्राप्त होत आहे.

✍️विनायक काळदाते
धनगर धर्मपिठ म.राज्य.

https://scontent.fnag6-1.fna.fbcdn.net/v/t66.36281-6/10000000_404862344080075_4084954761306530488_n.mp4?_nc_cat=107&ccb=2&_nc_sid=985c63&efg=eyJ2ZW5jb2RlX3RhZyI6Im9lcF9zZCJ9&_nc_ohc=daTlQWmSPdAAX-o-i4k&_nc_ht=scontent.fnag6-1.fna&oh=563842f655b44f78b5ff4a6b6d69ec79&oe=60238D4D

अकोट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *