💐धर्मपिठाच्या कार्याध्यक्ष पदी श्री.विनायक काळदाते यांची निवड  -डॉ. अभिमन्यू टकले.💐

🕉️श्री विनायकजी काळदाते कार्य अध्यक्ष धर्मपिठ महाराष्ट्र राज्य पदी निवड 🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन l मा कर्मफलहेतुरभूर्मा ते संङ्गोस्त्वकर्मणी ll🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯श्री विनायक जी काळदाते एक तडफदार एम.एससी ॲग्री बॅन्क अधिकारी पण तेवढाच विनयशील माणूस. एक बंधु पिड्याट्रीक डाॅक्टर, एक बंधू उच्च अधिकारी आदिवासी विभाग,वहिनी डॉक्टर, पुतण्या डॉक्टर, मुलगा डॉक्टर, व्याही माजीआमदार. अशाही परिस्थितीत विद्या विनयेन शोभते या प्रमाणे जमिनीवर पाय असलेला माणूस म्हणजे विनायक जी काळदाते .
आपले कर्तृत्व,उर्जा,पारदर्शक भुमिका व संपर्क यंत्रणेच्या सहाय्याने धनगर धर्म पिठाला लोकाभिमुख करण्यास हातभार लावून समाजाची ही अराजकीय चळवळ “धर्म पिठ”घरा घरात पोहचवण्यासाठी मिशनरी प्रमाणे काम करणारे श्री.विनायक काळदाते, नाशिक यांची धर्मपिठाचे कार्यध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. सदर नेमणूक धर्मपिठाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. अभिमन्यू टकले यांनी केंद्रीय अध्यक्ष श्री.बापूसाहेब हटकर व महाराष्ट्र अध्यक्ष डॉ. श्री.विष्णूपंत गावडे यांच्या सोबत परामर्श घेऊन करण्यात आली.

🌹परिचय-श्री.विनायक काळदाते हे एम.एससी (कृषी) एम.बि.ए.असून बँक मँनेजर आहेत.राष्ट्रीयकृत बँकेच्या नोकरीत असताना त्यांनी गुजरात, महाराष्ट्र, गोवा प्रदेशात सेवा करून त्या त्या परिसरातील समाजबांधवांना बँकेच्या व सरकारच्या योजनांचा लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न केला. समाजातील गरजवंताना व पात्र व्यक्तींना शेतीकर्ज, गृह कर्ज, शैक्षणिक कर्ज मिळवून दिले,पात्र लोकांना कर्जमाफी मिळावी म्हणून मदत केली.समातील गोरगरीब मुलींच्या लग्नाला मदत केली.वधुवर परिचय मेळाव्यात सक्रिय सहभाग नोंदवून मुला मुलींच्या पालकांना ते मदत करतात.शाखाभेद नष्ट करण्यासाठी सतत प्रयत्न करत असतात. धर्म पिठाच्या माध्यमातून झालेल्या परिचयातून,संघटनातून सुद्धा दोन तिन विवाह त्यांच्या कडून निश्चित होण्याच्या मार्गावर आहेत.आपल्या ईतर राज्यातील नेमणूकी दरम्यान त्यांनी दक्षिण गुजरात मधील भरवाड बांधव व गोव्यातील गवळी धनगर बांधवांना मदत केली,संघटन केले.मेंढपाळावरील हल्ले, महिलांवरील अत्याचार, वसतिगृह, शिष्यवृत्ती,वनविभाग अडचणी,समाजाच्या श्रद्धा स्थानांवरील अतिक्रमण, आरक्षण अशा विविध विषयांवर ते सरकार व लोकप्रतिनिधींकडे नेहमी पाठपुरावा करत असतात, पत्र,मेल,निवेदने देत असतात.
समाजातील सुशिक्षितांना नोकरीसंधी,उद्योग व्यवसाय मार्गदर्शन तसेच शेतकरी बांधवांना आधुनिक शेती व शेतीपूरक व्यवसाय सुरू करणे,निर्यात करणे कामी प्रेरणा देत असतात. समाजाने वैयक्तिक व सामुहिक पातळीवर शेतमाल प्रक्रिया उद्योग उभारावे यासाठी ते प्रबोधन करत असतात.त्यांच्या या कार्याची पावती म्हणून महाराष्ट्र शासनाने त्यांना 2003 साली “शेतीमित्र” पुरस्कार प्रदान केला,बँकने उत्कृष्ट कार्य निष्पादनासाठी राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कार प्रदान केला.
श्री.काळदाते हे उत्कृष्ट कवी व लेखक आहेत व समाजाचा जागल्या म्हणून सोशलमेडीयावर लेखन करत असतात.
श्री.काळदाते यांचे कुटुंब वैद्यकीय व्यवसायाशी निगडित आहे ते समाजातील गरजवंताना योग्य उपचारासाठी मार्गदर्शन व पाठपुरावा करत असतात. मागील वर्षी सोशलमेडीयावर अपिल करून त्यांनी कँन्सर ग्रस्त समाजबांधवांला लक्षणीय आर्थिक मदत मिळवून दिली.
आपली ओळख व अस्तित्व मुळात समाजामुळे असते असे त्यांचे मत आहे. उर्वरित आयुष्य त्यांनी समाजकार्यासाठी खर्च करण्याचे ठरवले असून प्रत्येकाने दिवसातील कमित कमी एक तास समाजासाठी दयावा असा त्यांचा सल्ला आहे.
समाज संघटन, प्रबोधन व सर्वांगीण विकास या त्रिसूत्रीवर अराजकीय चळवळ उभी करण्याची धर्मपिठाची भुमिका पुढे घेऊन जाण्यासाठी अविरत प्रयत्न करण्याचा त्यांचा माणस आहे.
श्री.काळदाते हे उर्जावान, चारित्र्यवान आहेत,बेदाग आहेत,निगर्वी आहेत त्यांची धर्मपिठाचे कार्यध्यक्ष पदी नेमणूकीमुळे अध्यक्षीय टिमला आपले व्हीजन व मिशन पुढे घेऊन जाण्यात मोठी मदत होईल असा ठाम विश्वास आहे.आपण सर्वजन त्यांच्यावर सोपविलेल्या या नविन जबाबदारीचे स्वागत करु,त्यांना मदत करु व धर्म पिठाचा नावलौकिक वाढविण्यासाठी प्रयत्न करु.त्यांच्या या निवडी मुळे महाराष्ट्र राज्यात आंनदाचे वातावरण निर्माण झाले आहे.त्यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
श्री.काळदाते यांचे या नवीन नेमणुकी बद्दल अभिनंदन व उत्कृष्ट कार्यासाठी शुभेच्छा.🌹
🌹डॉ. अभिमन्यू टकले
सस्थापक अध्यक्ष, आदिवासी धनगर साहित्य संमेलन व धनगर धर्मपिठ-महाराष्ट्र राज्य.
🌹श्री बापूसाहेब हटकर
केंद्रीय अध्यक्ष, धनगर धर्मपिठ.🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕

धार्मिक, महाराष्ट्र, मुंबई

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *