विदर्भातील थोर संत झिंग्राजी महाराजांची आज पुण्यतिथी-ह.भ.प.नंदकिशोर महाराज कोल्हे..

🕉️🚩🔯🚩🕉️🚩🕉️आज दि.22जानेवारी, विदर्भात होउन गेलेले संत झिग्राजी महाराज यांची आज पुण्यतिथी🕉️🚩🕉️🚩🔯🚩🕉️🚩

महाराष्ट्र ही संताची भुमी म्हणून प्रसिद्ध आहे.महाराष्ट्राच्या प्रत्येक विभागात मोठी संत परपरा आहे.विदर्भात संत गजानन महाराज,झिंग्राजी महाराज,नरसिंग महाराज,तुकडोजी महाराज, गाडगेबाबा,मुंगसाजी महाराज गुलाबबाबा,पुंडलीक महाराज व ईतर ज्ञात अज्ञात संतमडळी होउन गेली.यापैकी काही संतमडळी व त्यांचे देवस्थानांना कमी अधिक प्रमाणात प्रसिध्दी मिळाली.परंतु ही सर्व संत मंडळी प्रचितीच्या क्षेत्रात एकसमान होत्या. संतमडळींना कुठलीही जात नसते ,कुळ नसते.त्यांच्या अलौकिक कार्याने ते सर्वच समाजात वंदनीय ठरले.
असेच एक संत झिंग्राजी महाराज विदर्भातील अमरावती जिल्ह्यात अंजनगाव सुर्जी तालुक्यात मुऱ्हा (देवी) या गावात होउन गेले.धनगर कुटुंबात जन्माला आलेले झिंग्राजी महाराज आपल्या दैवी शक्ती व लिला यांच्या जोरावर त्याकाळात भक्तांच्या गळ्यातील ताईत होउन गेले.
झिंग्राजी महाराज हे गजानन महाराजांच्या समकालीन संत.गजानन महाराजांच्या पोथी म्हणजे विजय ग्रंथात हा ग्रंथ लिहिणाऱ्या दासगणू महाराजांनी झिंग्राजी महाराजांचा उल्लेख केलेला आहे.गजानन महाराज, झिंग्राजी महाराज, अकोटचे नरसिंग महाराज हे एकमेकांच्या संपर्कात असत व आपले जनकल्याणाचे कार्य ते आपल्या भक्त वर्गात करत असत.
झिंग्राजी महाराज हे विदेही होते ,अपवादात्मक परिस्थितीत मृत व्यक्तीला जिवंत करणे,कोरड्या विहीरीला पाणी आणणे, महापूरातून बाहेर येणे असे अनेक चमत्कार त्यांच्या नांवावर आहेत.निस्वार्थी भावनेने आपल्या भक्तांना बोध देण्यासाठीच या समकालीन संतानी चमत्कार केले.झिंग्राजी महाराज सुद्धा अवलियाच होते,त्यांना अंगावरील कपड्यांचे किंवा भौतिक सुखाची भ्रांत नव्हती, गोडधोड, शिळे-ताजे,गरीब-श्रीमंत हा फरक त्यांच्या लेखी नव्हता.
मुऱ्हा या गावी एकविरा देवीचे प्राचीन मंदिर असून झिंग्राजी महाराजांचे जन्मस्थळ व कार्यस्थळ सुद्धा आहे.या मुऱ्हा गावात देविचे जागृत देवस्थान असल्यामुळे गावाचे नांवच मुऱ्हादेवी असे झाले आहे.या मुऱ्हा येथील एकविरादेवी मंदिराच्या ईशान्य बाजूला भुयारात झिंग्राजी महाराजांचे समाधी स्थान आहे.
झिंग्राजी महाराजांच्या सानिध्यातच त्यांचे शिष्य नारायण महाराज तयार झाले.या नारायण महाराजांनी अकोला जिल्ह्यातील शिरसोली या गावी झिंग्राजी महाराजांचे मंदिर उभारले. या नारायण महाराजांचे शिष्य म्हणजे धर्मपिठाचे अकोला जिल्हा धर्मगुरु ह.भ.प.कोल्हे महाराज. वैकुंठवासी संत वासुदेव महाराजांनी झिंग्राजी महाराज यांचा ग्रंथ लिहिला आहे.धर्मपिठाचे कोल्हे महाराज शिरसोली येथील झिग्राजी महाराज सस्थानवर प्रतिनिधी म्हणून सुद्धा आहेत,त्यांनी आपले गुरु व झिंग्राजी महाराज यांचे शिष्य नारायण महाराज यांची आरती सुद्धा रचली आहे.गावातील ह.भ.प.खोटरे दादा हे शिरसोली येथील झिग्राजी महाराज मंदिराची पुजाअर्चा करतात.
मागील विस वर्षांपासून दरवर्षी पौष शु.नवमीला शिरसोली जिल्हा अकोला येथे झिंग्राजी महाराजांची पुण्यतिथी साजरी होते ,यावर्षी ति 22जानेवारी2021 रोजी आहे.शिरसोली येथील वाघ कुटुंब परंपरागत पद्धतीने पुण्यतिथीला अन्नदान करत असतात.
आज विदर्भ संत झिंग्राजी महाराज यांची पुण्यतिथी आहे,आपण सर्व त्यांच्या स्मृतीला वंदन करु व त्यांना भावपुष्प अर्पण करु.

✍️विनायक काळदाते
कार्यध्यक्ष,धर्मपिठ म.रा.
माहिती-ह.भ.प.नंदकिशोर महाराज
कोल्हे, धर्मगुरु,
धर्मपिठ, म.रा.

धार्मिक, पुण्यतिथी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *