समाजसेविका सौ.मिनाताई होपळ यांची धर्मपिठ महिला आघाडी विदर्भ अध्यक्ष पदी निवड.

🕉️🛕🔯धर्मपिठ महिला आघाडी विदर्भ अध्यक्ष पदी समाजसेविका सौ.मिनाताई होपळ यांची निवड🕉️🛕🔯🛕🕉️🌹🕉️🌹

समाज प्रबोधन,शिक्षण, समाजसेवा या माध्यमातून सर्वागीण समाज विकास साधन्याचे धोरण,मिशन व व्हिजन असलेल्या धर्मपिठात समाजातील उत्कृष्ट समाजसेवक,समाजसेविका सहभागी होत आहेत. शिक्षक, शिक्षिका, प्राध्यापक, डॉक्टर, पत्रकार, महिला ,जेष्ठ नागरिक ,तरुण सामिल होत आहेत ही धर्मपिठाच्या पारदर्शक धोरणाची पावतीच आहे.
धर्मपिठाची महिला आघाडी सुद्धा आपल्या कार्यसहभागाने धर्मपिठाच्या कामकाजात नेहमी अग्रेसर असते.

🌹सौ.मिनाताई होपळ यांची महिला आघाडी विदर्भ अध्यक्ष
निवड🌹
मागील बारा तेरा वर्षांपासून अकोट जि.अकोला येथे डिसेंबर महिन्यात आयोजित होत असलेल्या वधूवर परिचय मेळाव्याचे नियोजनात सिंहाचा वाटा असलेल्या सौ.मिनाताई होपळ ह्या मेळाव्याचे बॅक आँफिसच म्हणावे लागेल.
दरवर्षी निराधार विद्यार्थ्यांना व वृध्दाश्रमातील जेष्ठ नागरिकांना आपल्या घरी एक दिवस घरी मुक्कामी आणून, त्यांना घरपण देण्याचे समाजकार्य सुद्धा त्यांच्या नावावर आहे.लाँकडाउन काळात सर्वत्र रोजगार थांबलेले असतांना सौ.मिनाताई होपळ यांनी परिसरातील दिव्यांग कुटुंबाना आपल्या स्त्रीधनातून मदत केली.
आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार प्राप्त मा.श्री.रामदासजी होपळ सर यांच्या अर्धांगिनी असलेल्या सौ.मिनाताई श्रीयुत सरांच्या यशात त्यांच्या पाठीमागे सशक्त पणे उभ्या असतात.सौ.मिनाताई आपले यजमान श्री.होपळ सर यांच्या जि.प.शाळेत सुट्टी च्या दिवशी जाऊन शाळा सुशोभित करतात जेणे करून विद्यार्थ्यांना शाळेत आनंद वाटेल.त्यांनी पुर्णवेळ निस्वार्थ समाजसेवेला वाहून घेतले आहे.
सौ.मिनाताई होपळ यांची धर्मपिठ महिला आघाडीच्या विदर्भ अध्यक्ष पदी झालेली निवड धर्मपिठाचे कामकाज पुढे घेऊन जाण्यासाठी फार मोलाची ठरणार आहे,त्यांना आपल्या कार्यात शुभेच्छा🌹
✍️सौ.शारदाताई ढोमने
धर्मपिठ महिला राज्य अध्यक्ष.
रेश्मा ठोंबरे
प्रसिद्धी प्रमुख

🕉️🌹🕉️🌹🕉️🌹🕉️🌹

अकोला, निवड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *