मा.आ.हरिदासजी भदे यांच्या नेतृत्वात अकोला येथे भव्यदिव्य राष्ट्रवादी प्रवेश सोहळा संपन्न.

माजी आमदार हरिदास भदे यांच्या नेतृत्वात व मा. ना. जयंतराव पाटील प्रदेशाध्यक्ष,व जिल्हा अध्यक्ष संग्राम भैया गावंडे
यांच्या उपस्थितीमध्ये भव्य राष्ट्रवादी प्रवेश सोहळा संपन्न.

अकोला प्रतिनिधी
अकोला येथे आयोजित मा.आ. हरीदास भदे यांच्या निवासस्थानासमोर जवाहरनगर परिसरात राष्ट्रवादी काॅग्रेस परिवार संवाद यात्रेच्या विदर्भ दौर्‍यावर असतांना मा. ना. जयंत राव पाटील प्रदेशाध्यक्ष मा. नामदार मा. ना. राजेंद्रजी शिंगणे संपर्कमंत्री तसेच महिला प्रदेशाध्यक्ष रूपालीताई चाकणकर, अल्पसंख्यांक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, युवक प्रदेश अध्यक्ष रमेश वरपे ,युवती प्रदेशाध्यक्ष सक्षणाताई सलगर व जिल्हाध्यक्ष संग्राम भैय्या गावंडे मा. आ. तुकाराम बिरकड मा.आ. गुलाबराव गावंडे मा. आ. हरिदास भदे मा. आ. बळीराम सिरस्कार मा. संतोष दादा कोरपे मा. राहुल भाऊ डोंगरे मा. रविभाऊ राठी मा. विजय देशमुख मा. कृष्णा अंधारे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये जवाहर नगरातील खुले मैदानावर कार्यक्रम घेऊन या कार्यक्रमात एकूण १४८० लोकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी गोपाळभाऊ गावडे ,सजय गाडगे, डॉ. अशोक पातुर्डे डॉ. सुरेश नागे व त्यांच्यासोबत सचिन बचे, अभिषेक नवलकार रविराज घोंगे, मनोज करंणकर,लक्ष्मण पातोंड तसेच अमरावती येथील जेष्ठ महिला नेत्या सौ.शारदाताई ढोमने व धनगर समाज सघटनेच्या विविध पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रवेश केला यावेळी धनगर समाज संघटना व कर्मचारी संघटनेच्या वतीने मा. ना. जयंत रावजी पाटील साहेब प्रदेशाध्यक्ष यांना धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची अंमलबजावणी अध्यादेश १९५६व १९७६ च्या भारतीय राज्यघटनेच्या कलमानुसार अनुसूचित जमाती सुधारणा कायद्यानुसार आरक्षणाची अंमलबजावणी करावी असे निवेदन दिले, निवेदन देतांना धनगर समाज संघटनेचे पदाधिकारीडॉ. सुरेश बचे प्रा.एल डी सरोदे, सदाशिवराव काळदाते ,कैलास बचे, विनायकराव काळदाते, देवराव खराटे , डॉ.सुरेश नागे, डॉ. अशोक पातुर्डे, गणेश राव नवलकर आणि त्यांच्या समवेत असणारे कार्यकर्ते पदाधिकारी यांनी निवेदन दिले तसेच प्रदेशाध्यक्ष मा.ना.जयंतराव पाटील यांचे अकोला जिल्हा धनगर समाज संघटना व कर्मचारी संघटनेच्या वतीने जबो हार घालून स्वागत करण्यात आले कार्यक्रमाच्या सुरुवातीला महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन व प्रमुख अतिथींच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले प्रमुख पाहुणे यांनी आपले मनोगत व्यक्त केले तर अध्यक्षीय भाषण प्रदेशाध्यक्ष मा. ना. जयंतराव पाटील यांनी अकोला जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसला नवचैतन्य आले आहे येणारा काळ हा जिल्ह्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पक्ष संघटन मजबूत करून या जिल्ह्यातील संपूर्ण सत्ता हस्तगत करावी असे गौरवोद्गार काढले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ बिस्मिल्ला खान यांनी केले तर प्रास्ताविक मा आ हरीदास भदे यांनी केले तर आभार प्रा एल डी सरोदे यांनी मानले, कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दिनकरराव नागे मनोरहराव भदे, बंडू भाऊ भदे,रमेशराव भदे, गणेशराव भदे, विनायकराव काळदाते ,विजय हुबाले सांगली, डॉक्टर सुरेश नागे ,संजय गाडगे, दयाराम खाडे , लक्ष्मणराव खाडे, मंगेश घोंगे डॉ. रामदास नवलकर. महादेवराव साबे ,मनोज करण कार, गोपाल गावंडे, रविराज घोंगे, राजेश दिवनाले सर, सचिन बचे, अभिषेक नवलकार , गजानन मालठाणे, आशिष कोल्हे, अरविंद गाढवे, बाबूसिंगपवार सहदेव खराटे आशीष कोल्हे,रविभाऊ मारकड, निखिल गाढवे, भारत चिकटे,देवमन चरहाटे,गजानन खराटे , गजानन वसतकार, श्रीकांत शिरसाट, विलास वाघ, विलास गिरी ,गणेशराव इंगोले ,बाळासाहेब मेसरे, भानुदास नंदाने आत्माराम मात्रे इम्रान भाई व महिलां प्रतिनिधी, दीपाताई भदे, प्रमिलाताई काळदाते, माधुरी गिरी, ललिता मेंहगे ,नलिनी राठोड ,सुषमा राठोड, जयश्री नवलकर, सुनंदा जावळे, अर्चना गाडगे ,प्राची नागे शितलताई पाचपोहे, पद्मावती भगेवार ,अर्चना नेमाडे ,सुरेखा कोरकणे, वैशाली राठोड ,प्रतिभा गिरी, सारिका सातरोटे, सविता गिरी, इत्यादी पदाधिकारी व हजारो ग्रामीण भागातील कार्यकर्ते कार्यक्रमाला उपस्थित होते कार्यक्रम संपन्न झाला.

अकोला, महत्वाची बातमी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *