बपोरी ग्रामपंचायत सरपंच पदी मोनिका खंडारे तर उपसरपंचपदी राम पाटील खंडारे.

बपोरी ग्रामपंचायत निवडणुकीत मोनिका पंकज खंडारे सरपंचपदी तर उपसरपंचपदी राम पाटील खंडारे यांची निवड
मुर्तीजापुर प्रतिनिधी
दिनांक ११ फेब्रुवारी रोजी पार पडलेल्या ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच पदाच्या चुरशीच्या निवडणुकीमध्ये ग्राम विकास पॅनलचे सरपंचपदी मोनिका पंकज खंडारे तर उपसरपंचपदी राम पाटील खंडारे यांची बहुमताने निवड करण्यात आली यावेळी रामराव जाधव मंडळ अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी व ग्रामसेवक संघपाल वरघट व तलाठी गणेश भारती व गावातील सर्व नागरिक उपस्थित होते निवडणूक शांततेत पार पडली निवडणूक निर्णय अधिकारी व त्यांच्या सहकाऱ्यांनी निवडणूक निर्णय दिल्यानंतर सर्व नवनिर्वाचित सदस्यांचे सरपंच उपसरपंच यांचे गावकरी यांनी आभार मानले व सर्वांचे अभिनंदन केले यावेळी पुष्प गुच्छ देऊन हार घालून सर्वांचे स्वागत व गावात एकच जल्लोष करून आतिषबाजी करण्यात आली गावातील नागरिकांनी पुढील वाटचालीसाठी सर्वांना हार्दिक शुभेच्छा दिल्या

निवड, मुर्तीजापूर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *