
धनगर धर्म पिठा मार्फत लवकरच पहिली राज्य स्तरीय ऐतिहासिक धर्म संसद होनार 🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन l मा कर्मफलहेतुरभूर्मा ते संङ्गोस्त्वकर्मणी ll🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯
तमाम महाराष्ट्र राज्यातील अध्यात्म,धर्म, क्षेत्रातील व धर्म प्रिय सज्जन व मान्यवरांना व धर्म पिठ पदाधिकारी, धर्म गुरू,अनुयायी, भक्त,संत, संत साहित्यीक यांना कळवण्यास आंनद होत आहे की महाराष्ट्र राज्यात लवकरच धर्म संसद आयोजित करवयाची आहे.धर्म म्हणजे सत्य.सत्याला कधी जात आणि धर्म नसतो.त्या प्रमाणे सर्व समावेशक धर्म संसद होनार आहे.
सध्याच्या युगात समाजाला योग्य दिशा देने,मार्गदर्शन करने,सज्जनांना एकत्र करने हे काम फक्त साहित्य संमेलन आणि धर्म या दोनच व्यासपीठावर होऊ शकते .या उलट समाजाला एखाद्या मुद्यावर भावनीक बनवून त्याचा स्वतःच्या पक्षासाठी व मतासाठी उपयोग करून फेकून देण्याचे काम राजकीय नेते करत असतात. बहुजन, ओबीसी यांना धर्मातही फक्त भक्त आणि देणगीदार दर्जा प्राप्त आहे.देशात जरी लोकशाही व घटनेचे राज्य असले तरी लोकांच्या मनावर धर्माचे राज्य आहे हे नकारून चालनार नाही.या मध्ये ८५%हिंदू हे ओबीसीं आहेत. यांना धर्म स्वातंत्र्य असले तरी व्यासपीठ मात्र कोणीही तयार केलेले नाही.त्या साठी आपण धनगर धर्मपिठ प्रभावी असे व्यासपीठ तयार केलेले आहे.अनेक धर्मपिठ आहेत पण त्यांचा सामान्य माणसाला काहीच उपयोग नाही. अनेक अरबो खरबोची देवस्थान आहेत पण ते फक्त देणग्या गोळा करुन एखादेअन्नछत्र व एखादे रूग्णालय चालवने या पलीकडे गेलेले नाहीत.जे जगात बहुसंख्य लोकांचे धर्म आहेत त्यांना जगभर राजाश्रय आहेत व आपल्या देशात ही राजाश्रय आहे.ते योग्यच असले तरी हिदू धर्माला मात्र जगात कोठेच राजाश्रय नाही.धर्म विद्यापीठ नाहीत.धर्म शिक्षण, संशोधन, प्रसारण नाही. धनगर आणि बहुजन समाजाचा जसा अडगळीत पडला ईतिहास होता तो आपण साहित्य संमेलन माध्यमातून बाहेर काढला तसेच ही दैवतेही बाहेर व्यासपीठावर आली पाहिजेत. हिदू धर्मा पासून प्रिंट मिडीया ही खूप दूर गेलेला आहे.
महाराष्ट्र ही संताची भूमी.तुकोडोजी महाराज, संत गोरा कुंभार, संत ज्ञानेश्वर माउली,संत एकनाथ महाराज, संत तुकाराम महाराज, संत चोखा मेळा, संत सेवालाल महाराज, संत रोहिदास महाराज, संत बाळुमामा, संत जनाबाई, संत भगवान बाबा. संत गाडगे महाराज, संत कैकाडी महाराज,संत सावता महाराज. कितीतरी जमिनीवर चालून समाज प्रबोधन करणारी संत दैवते या राज्याच्या भूमीत होउन गेली. यांचे चांगभल धनगर धर्मपिठा मार्फत झाले पाहिजे.
खंडोबा, बिरोबा,सिध्दोबा, महालिंगराया, म्हसोबा, बाबींरबुआ, सोमलिंगराया, भूताळ सिध्द, चिचंणी मायाक्का, अशा अनेक या दैवतांचा धार्मिक इतिहास,बाहेर आला पाहिजे.लाखो लोकांच्या यात्रा ,जत्रा भरतात याचे सुयोग्य नियोजन झाले पाहिजे.अनेक धार्मिक ओव्या आहेत. हलमत नावाचा कन्नड मध्ये धर्म ग्रंथ आहे. हा मौलीक ठेवा, ही मौलीक धर्म संस्कृती आपण टिकवायला पाहीजे.वाईट कर्मकांड काढून टाकले पाहिजेत.सर्वात महत्वाचे धनगर आणि बहुजनांना एक चांगले धार्मिक व्यासपीठ मिळावे या साठी धर्म संसद झाली पाहीजे.बहुजनांच्या धर्माचा आवाज राज्याच्या आणि देशाच्या सरकारच्या कानात सकारात्मक द्रुष्टीने घुमला पाहिजे.संत सज्जन एकत्र आली पाहिजेत तरच राज्यात आणि देशात एक चांगली समाज परिवर्तन करणारी व सुसंस्कृत पिढी घडवनारी चळवळ सुरू झाली पाहिजे.
शंकराचार्य नंतर आदर्श राज्य कारभार व आदर्श धर्म शिक्षण, धर्म संवर्धन, धर्म रक्षण,प्रसारण कार्य पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी केलेले आहे. त्यांचा वारसा सक्षम पणे टिकवण्या साठी आपणाला या पालखीला खांदा द्यावा लागणार आहे.राज्यातील तमाम धर्म,अध्यात्म प्रिय जनांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा हिंदू धर्माचा वारसा टिकवण्या साठी उत्कृष्ट धर्म कार्य करणार्या मान्यवरांचा सन्मान करण्यासाठी यादी तयारी करावी.महाराष्ट्र राज्यात 80%हिंदू धर्मीय आहेत तर 80%हिंदूचा व 20%अल्प संख्याक 20% अल्पसंख्याक धर्म कार्य करणार्या संत, अनुयायांचा ही सन्मान करण्यात येईल.तसेच जे कोणी धर्म चर्चा सत्र,परिसंवाद या मध्ये भाग घेवू ईच्छीते त्यांनीही आपली नावे खालील पदाधिकारी यांच्या कडे द्यावेत.धनगर धर्म पिठ सर्व कर्तुत्वान लोकांसाठी खुले आहे.
संपर्क फोन नंबर
१] श्री बापूसाहेब हटकर मुंबई. केंद्रीय अध्यक्ष. 7710020069. २]श्री विनायक काळदाते कार्याध्यक्ष नाशिक
8208558546
३]श्री प्रभाकर दिवनाले आकोला. विदर्भ धर्म गुरू.
४]श्री बबन बरकडे केंद्रीय उपाध्यक्ष. सातारा.9423827878
५]श्री ज्ञानेश्वर ढोमणे जिल्हाप्रमुख आमरावती 9423434223
६]श्री विठ्ठल सजगने सर जि. अध्यक्ष.माणदेश. 9423828908
७]श्री प्रकाश कोळेकर जिल्हाध्यक्ष सोलापूर. 9970817591
८]डाॅ.मधुकर सलगरे सर लातूर. धर्म गुरू मराठवाडा 9922245380
९] श्री सोमनाथ कर्णवर API मुंबई विभाग.9595114444
१०]डाॅ.विजय पाटील कोकण प्रमुख 9890730893
११] डाॅ. सत्यवान गडदे पुणे जिल्हाध्यक्ष पुणे.
१३]डाॅ.प्रविण सहावे नागपूर9326863318
लवकरच पिठ पदाधिकाऱ्यांसोबत वैयक्तिक चर्चा करून , वेळ,स्थळ,चर्चा सत्र,परिसंवाद विषय, मुख्य अतिथी ठरवले जातील.यळकोट यळकोट जय मल्हार, हरहर महादेव,जय भवानी जय शिवशंकर च्या गर्जनेत पहिली धर्म संसद एकदम दणक्यात घेतली जाईल. धर्म संसद कशी असेल या वरतीही एक लेख लिहीला जाईल.
आपलेच एक सर्वांच्या हक्काचे पहिले एकमेव राज्य स्तरीय व्यासपीठ धनगर धर्म पिठ महाराष्ट्र राज्य. आपल्या संस्कृती आणि धर्माचा अभिमान असेल तर धर्म पीठ महाराष्ट्र राज्याच्या घराघरात पोहचवा.अभिमान बाळगा सर्व धर्म संस्कृती चा मुळ पुरूष धनगर आहे.🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕