चाईल्ड लाईन 1098 श्री.ह.व्या.प्र.मंडळ अमरावती यांच्या मदतीने अल्पवयीन बालिकेला मिळाला सहारा.

प्रा.एल.डी.सरोदे यांचे कडून

*चाईल्डलाईन 1098 श्री. ह व्या प्र मंडळ अमरावती च्या मदतीने 15 दिवसापासून भटकत असलेल्या 14 वर्षीय अल्पवयीन बालिकेला मिळाला निवारा* सविस्तर माहिती अशी की, 0 ते 18 वयोगटातील काळजी आणि संरक्षणाची नितांत गरज असणाऱ्या बालकांकरिता मदतीचा टोल फ्री क्रमांक चाईल्डलाईन 1098 अमरावती ला मिळालेल्या प्राप्त माहितीनुसार एक 14 वर्षीय अल्पवयीन मुलगी पालकाविना धामणगाव रेल्वे येथे बऱ्याच दिवसापासून एकटी भटकत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार तात्काळ चाईल्डलाईन श्री. हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ, अमरावती ची टीम यांनी धामणगाव रेल्वे गाठले व चाईल्ड लाईन टीम व रेल्वे पोलीस यांनी भटकत असलेल्या मुलीचा शोध घेणे सुरू केला. तेव्हा मुलगी रेल्वे स्टेशन परिसरात भटकत असताना दिसली. तेव्हा चाईल्ड लाईन सदस्या मीरा राजगुरे व पंकज शिनगारे यांनी मुलीची भेट घेऊन मुलीचे समुपदेशन केले तेव्हा मुली कडून माहिती मिळाली की, मुलगी 2 वर्षाची असतानाच तिची आई मरण पावली व वडील ट्रक चालक असल्याने नेहमी बाहेर गावी भटकत राहतात. त्या कारणास्तव मुलगी त्यांच्या नातेवाईकांकडे राहत होती. परंतु तेथे मुलीला मारहाण, व शाब्दिक अत्याचार सहन करावा लागत असे या त्रासाला कंटाळून मुलगी मागील 15 दिवसापासून रेल्वे स्टेशन वर भटकत होती. तसेच तिला पालन पोषणाची व शिक्षणाची मदत हवी असल्याची माहिती मुलीने चाईल्ड लाईन टीम ला दिली. तेव्हा चाईल्ड लाईन टीम नि मुलीला जवळील पोलीस स्टेशन दत्तापुर येथे आणले व संबधीत प्रकरणाची माहिती पोलीस स्टेशन ला देऊन मा. बालकल्याण समिती अमरावती, व जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अमरावती यांना दूरध्वनीवरून देऊन त्यांच्या तोंडी आदेशाने मुलीला काळजी आणि संरक्षणाची गरज असल्याने तात्काळ शासकीय मुलींचे बालगृह व निरीक्षण गृह अमरावती येथे दाखल केले. व मागील 15 दिवसापासून भटकत असलेल्या मुलीला निवारा मिळून दिला . सध्यास्थित मुलगी बालगृहात सुरक्षित असून पुढील पाठपुरावा चाईल्ड लाईन टीम अमरावती करीत आहेत. तसेच संकटग्रस्त व आपत्कालीन परिस्थितीत त्याचप्रमाणे काळजी आणि संरक्षणाची नितांत गरज असलेल्या बालकांच्या मदती करिता चाईल्ड लाईन 1098 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करण्याचे आव्हान चाईल्ड लाईन 1098 टीम अमरावती यांनी केले आहे. प्रकरणामध्ये मोलाचे मार्गदर्शन श्री. हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे प्रधान सचिव पदमश्री श्री प्रभाकरराव वैध , सचिव प्रा. सौ. माधुरीताई चेंडके, चाईल्डलाईन चे संचालक प्रा.डॉ. सुर्यकांत पाटील, उपसंचालक प्रा. प्रशांत घुलाक्षे यांनी केले. तसेच बालकांच्या मदती साठी दिवस रात्र मोलाचं कार्य चाईल्डलाईन 1098 अमरावतीचे केंद्र समन्वयक अमित कपुर, टिम मेंबर पंकज शिनगारे, मिरा राजगुरे, शंकर वाघमारे, अजय देशमुख, सुरेन्द मेश्राम, सरिता राऊत, व चेतन वरठे, करीत आहेत.

महत्वाची बातमी, मुर्तीजापूर, सामाजिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *