चाईल्ड लाईन1098 श्री.हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ अमरावती तर्फे “सुरक्षित बालपण पंधरवाडा”.

प्रा.एल.डी.सरोदे यांचे कडून

*चाईल्डलाईन 1098 श्री. हनुमान व्यायाय प्रसारक मंडळ, अमरावती तर्फे बालकांचे हक्क आणि अधिकारा विषयी कोरोना मध्ये सुरक्षित बालपण पंधरवाडा अभियान* सविस्तर माहिती अशी की, महिला व बालविकास मंत्रालय भारत सरकार यांच्या अंतर्गत व चाईल्डलाईन इंडिया फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडक, अमरावती यांच्या सहकार्याने मागील 2003 पासून 0 ते 18 वयोगटातील काळजी आणि संरक्षणाची नितांत गरज असणाऱ्या बालकांकरिता मदतीचा टोल फ्री क्रमांक चाईल्डलाईन 1098 अमरावती ही आपत्कालीन सेवा दिवस-रात्र कार्य करीत आहे. तसेच बालकांवर होणारे अत्याचार, शोषण दिवसेंदिवस वाढत असल्याने ते थांबविण्यासाठी व सद्यस्थितीत बालपण सुरक्षित राहण्यासाठी चाईल्डलाईन 1098 अमरावती द्वारा 17 मार्च ते 31 मार्च 2021 कोरोना मध्ये सुरक्षित बालपण पंधरवाडा अभियान राबविण्यात येत आहे. त्या मध्ये जर 0 ते 18 वयोगटातील बालकांना या अभियाना मध्ये सहभागी होण्यास इच्छुक असल्यास चाईल्ड लाईन 1098 सोबत संपर्क साधावा. सदर अभियानामध्ये घेण्यात येणारे उपक्रम. दिनांक 17 मार्च ला बोलक्या बाहुल्यांच्या माध्यमातून चाईल्डलाईन 1098 ची जनजागृती, दिनांक 18 मार्च कोरोना मध्ये बालपण सुरक्षित यावर उपाय योजना, दिनांक 19 मार्च कोरोना मध्ये मुलांवर मनावर झालेले दुष्परिणाम व सामाजिक स्वास्थ, 20 मार्च कोरोना संक्रमित बालक झाल्यानंतर घायव्याची काळजी, 21 मार्च चांगला स्पर्श व वाईट स्पर्श यासाठी बालकांनी कशी सुरक्षितता बाळगावी यावर मार्गदर्शन, 22 मार्च आरोग्य व स्वच्छता विषयी मार्गदर्शन, 23 मार्च कोरोनामध्ये योगा चे महत्व व त्यावर मार्गदर्शन, 24 मार्च बालविवाह या वर आधारित पथनाट्य, 25 मार्च बालकांचे हक्क व अधिकार याविषयी मार्गदर्शन, 26 मार्च बालकांचे लैंगिक अपराधापासून सुरक्षितता यावर आधारित बोलक्या बाहुल्यांच्या माध्यमातून जनजागृती, 27 मार्च कोरोना शाळा आणि शिक्षण यावर लघु नाट्य, 28 मार्च कोरोना मध्ये हरवलेले बालपण यावर मार्गदर्शन, 29 मार्च स्वछ भारत सुंदर भारत, 30 मार्च बालकांच्या जीवनातील खेळाचे महत्व, 31 मार्च कोरोना काळात बालकांच्या मनावर मोबाईल मुळे वाढत दुष्परिणाम, कोरोना मध्ये पालकांची बालकांविषयी मार्गदर्शन व समारोह प्रतिक्रिया इत्यादी कार्यक्रम ऑनलाईन पध्दतीने चाईल्ड लाईन 1098 श्री. हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ अमरावती द्वारा घेण्यात येणार आहे. कोरोना मध्ये सुरक्षित बालपण या अभियान मध्ये आपला सहभाग दर्शविण्यासाठी चाईल्ड लाईन सदस्य शंकर वाघमारे:- ९७६३३४१८२३, अजय देशमुख :- ७३९७९७५१८०, व चेतन वरठे :- ७०३८५६१३८२ अथवा चाईल्ड लाईन कार्यालया अमरावती ०७२१-२५६७३७२ / ०७२१-५६७६८८ व टोल फ्री क्रमांक 1098 यांच्याशी संपर्क करावा. सदर कार्यक्रमा मध्ये मोलाचे मार्गदर्शन श्री. हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे प्रधान सचिव पदमश्री श्री प्रभाकरराव वैध , सचिव प्रा. सौ. माधुरीताई चेंडके, चाईल्डलाईन चे संचालक प्रा.डॉ. सुर्यकांत पाटील, उपसंचालक प्रा. प्रशांत घुलाक्षे करीत आहेत तसेच बालकांच्या मदती साठी दिवस रात्र मोलाचं कार्य चाईल्डलाईन 1098 अमरावतीचे केंद्र समन्वयक अमित कपुर, समुपदेशक सपना गजभिये, टिम मेंबर पंकज शिनगारे, मिरा राजगुरे, शंकर वाघमारे, अजय देशमुख, सुरेन्द मेश्राम, सरिता राऊत, व चेतन वरठे, करीत आहेत.

महत्वाची बातमी, मुर्तीजापूर, सामाजिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *