
देवेंद्र थोटे यांचे कडून
*आज दि.20/3/21रोज शनिवार ला दुपारी 11वाजता नरखेड तालुक्यातील भिष्णूर प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत येणाऱ्या तिनखेडा, पिपंळगाव, परसोडी, दिनदरगाव, खुशालपूर, सिंगारखेडा, खरसोली, विवरा गावातील नागरिकांना कोविड -19 ची लस घेण्यासाठी बाहेर जावं लागत असल्यामुळे तो होणारा वयोवृद्ध व इतर आजारअसणारे नागरिक या त्रासाची त्वरित दखल घेऊन ते केंद्र सुरु करण्यासाठी सौं. नीलिमा सतीश रेवतकर सभापती यांनी मागणी करताच मा. श्री. सलीलदादा देशमुख सदस्य आरोग्य समिती जिल्हा परिषद नागपूर त्वरित सुरु करण्याचे निर्देश दिले. त्याचे लसीकरण केंद्र चे उदघाट्न सौं. नीलिमा सतीश रेवतकर सभापती यांनी केले. सर्वांनी लसीकरण करून घ्यावे व सहकार्य करावे असे सभापती यांनी सर्वाना विनंती केली.यावेळी उपस्थित श्री. डॉ. मोटे जिल्हा आयुष्य अधिकारी, श्री. डॉ. उमेश देशमुख, श्री. मोतीरामजी नासरे, श्री. अनिल रेवतकर माजी सरपंच, श्री गजानन नासरे सौं. जिजाबाई रेवतकर, सदस्य ग्रामपंचायत,श्री. प्रकाश नासरे,सौं.छाया ठाकरे सदस्य, प्रा. आ.समिती, सौं. राऊत, आशा वर्कर, आरोग्य सेविका, आरोग्य सेवक,सन्माननीय नागरिक उपस्थित होते.*