चाईल्ड लाईन 1098 श्री.ह.व्या.प्र.आणि FBH इंटरनँशनल स्कूल अमरावती तर्फे 0ते18 वयोगटातील बालकांसाठी उन्हाळी शिबीर.

*चाईल्डलाईन 1098 श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ व FBH इंटरनॅशनल स्कूल अमरावती तर्फे 0 ते 18 वयोगटातील बालकांसाठी उन्हाळी शिबीर*
सविस्तर माहिती अशी की, सध्यास्तीत मुले कोरोना या काळात घरात राहून राहून अगदी निरागस आहे. त्या करीता नेहमी मुलांच्या संरक्षण व काळजीच्या दृष्टीकोनातून 0 ते 18 वयोगटातील मुलांसाठी 15 दिवसाआधीच बालकांचे हक्क आणि अधिकारा विषयी कोरोना मध्ये सुरक्षित बालपण पंधरवाडा अभियान कार्यक्रम घेण्यात आला होता. त्याच अनुषंगाने दिनांक 5 ते 17 एप्रिल 2021 या कालावधीत दररोज दुपारी 4 ते 5 या वेळेत मुलांनाकरीता विविध असे ऑनलाईन कार्यक्रम घेऊन येत आहे. त्यामध्ये Mission Impossible ( Innocent Fun in culture ) क्रियाकलाप योग ,ध्यान, झुम्बा डान्स, रामायण कथा, शिजवलेल्या लिंबाचा रस, पार्ले-जी बिस्किट, फिंगर कठपुतळी, बलून आर्ट, लीफ आर्ट, फन गेम्स, फायरलेस पाक कला व क्राफ्ट, डफ आर्ट, इत्यादी मनोरंजनात्मक कार्यक्रम होणार आहे. त्यासाठी चाईल्ड लाईन 1098 बालगट या ग्रुप वर दररोज दुपारी 3 वाजता कार्यक्रमाची लिंक पाठवली जाईल. व आपण सदर कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी लिंक ओपन करून आपले नाव समाविष्ट करावे. तसेच ज्या कोणी बालकांचे नाव बाल गटामध्ये ऍड नसेल त्यांनी चाईल्ड लाईन कार्यालय अमरावती यांच्याशी दूरध्वनी क्रमांक 07212567688 , 07212567372 व टोल फ्री क्रमांक चाईल्ड लाईन 1098 या नंबर वर संपर्क करावा. सदर कार्यक्रमा मध्ये मोलाचे मार्गदर्शन श्री. हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे प्रधान सचिव पदमश्री श्री प्रभाकरराव वैध , सचिव प्रा. सौ. माधुरीताई चेंडके, चाईल्डलाईन चे संचालक प्रा.डॉ. सुर्यकांत पाटील, उपसंचालक प्रा. प्रशांत घुलाक्षे करीत आहेत. तसेच जिल्हा महिला व बालविकास अधिकारी अतुल भडांगे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अजय डबले, बालगृहातील अधीक्षक व समुपदेशक, यांचे सहकार्य लाभले त्याचप्रमाणे कार्यक्रमाचे नियोजन FBH इंटरनॅशनल स्कुल च्या प्राचार्य दिव्या पटेल करीत आहेत. व बालकांच्या मदती साठी दिवस रात्र मोलाचं कार्य चाईल्डलाईन 1098 अमरावतीचे केंद्र समन्वयक अमित कपुर, समुपदेशक सपना गजभिये, टिम मेंबर पंकज शिनगारे, मिरा राजगुरे, शंकर वाघमारे, अजय देशमुख, सुरेन्द मेश्राम, सरिता राऊत, व चेतन वरठे, करीत आहेत.

अमरावती, महत्वाची बातमी, सामाजिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *