भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटलांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध-हिरालालजी राठोड.

राष्ट्रवादी काँग्रेस व्हि.जे.एन.टी. सेल तर्फे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांचा जाहीर निषेध ! हिरालालजी राठोड.

पश्चिम बंगाल निवडणुकीच्या निकालावर महाराष्ट्राचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री मा.छगनरावजी भुजबळ यांनी दिलेली प्रतिक्रिया खिलाडू वृत्तीने न घेता “तुम्ही जामीनावर सुटलेले आहात,जोरात बोलू नका नाहीतर महाग पडेल”असे वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले त्याचा जाहीर निषेध राष्ट्रवादी काँग्रेस भटके विमुक्त आघाडीचे प्रदेशाध्यक्ष मा.हिरालालजी राठोड यांनी केला आहे.
श्री.राठोड म्हणाले निवडणुकीत जय-पराजय होतच असतो तो खिलाडू वृत्तीने घ्यायचा असतो परंतु चंद्रकांत पाटलांचे वक्तव्य हुकुमशाहीला धरून वाटते व व्यक्तीस्वातंत्र्याला व अभिव्यक्ती स्वातंत्र्याला न मानणारे असे वाटते.हि दडपशाही आहे.
महाराष्ट्रातील सर्व बहूजन समाज या वक्तव्याचा जाहीर निषेध करतो व आम्ही सर्व राष्ट्रवादी काँग्रेस भटक्या विमुक्त सेलचे पदाधिकारी याचा निषेध करत आहोत.
मा.चंद्रकांत दादा पाटलांचा तोल गेल्यासारखे वाटते,त्यांनी आपल्या या वक्तव्या बद्दल जाहीर माफी मागावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस भटके विमुक्त सेलचे प्रदेशाध्यक्ष श्री.हिरालालजी राठोड,प्रदेश सरचिटणीस श्री.रुपेश चव्हाण, सौ.शारदाताई ढोमणे, प्रदेश संघटक विनायक काळदाते, नाशिक जिल्हा अध्यक्ष शिवाजी दादा ढेपले, नागपूर जिल्हा कार्याध्यक्ष देवेंद्र थोटे,अकोला जिल्हा महिला आघाडी अध्यक्ष सौ.जयश्रीताई नवलकार, मुर्तिजापूर तालुका अध्यक्ष प्रा.एल.डी.सरोदे, नाशिक शहर अध्यक्ष समाधान ओहळ,सौ.संगिताताई पाटील,सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष सौ.मनीषाताई माने व इतरांनी केली आहे.

काटोल, निषेध

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *