12मे,आंतरराष्ट्रीय परिचारिका दिना निमित्त शुभेच्छा💐

१२मे २०२१आंतरराष्ट्रीय परिचारिका दिना निमित्त राज्यातील, देशातील कोरोनाशी आघाडीवर लढनार्या सर्व नर्सेस देवदूतांना कोटी कोटी प्रणाम 🌹🙏🌹
प्रा.डाॅ अभिमन्यू टकले
💉🌡💊💉🌡💊💉🌡💊💉🌡🩺💉🌡💊💉🌡💊
१२मे हा दिवस जगभर आंतरराष्ट्रीय परिचारिका दिवस म्हणून साजरा केला जातो. १२मे१८२०या दिवसी दिपधारी स्री फ्लोरेन्स नाईंटीगेल यांचा जन्म ईटाली येथे झाला होता. त्यांनी या आधुनिक परिचारिका व्यावसायाचा पाया रचला. १८५४च्या क्रिमीयन युध्दात फ्लोरेन्स नाईंटीगेल या हतात दिवा घेऊन १८०००युध्दात जखमी झालेल्या सैनिकांच्या जखमांची काळजी घेत असत म्हणून त्यांना दिप धारी स्री म्हणून संबोधले जाते.
१९४७ला ईडिंयन नर्सिंग कौंसील कायदा संसदेत पास झाला. या कायद्यानुसार देशभर आणि जगभर परिचर्या प्रशिक्षण व व्यावसायाचा दर्जा एकच राखला जातो. भारतीय व महाराष्ट्रीयन प्रशिक्षित परिचारिका ही जगभरात सुंसंस्क्रुत समजली जाते. २००४ सर्वेक्षणानुसार देशात १४,२२,४५२ प्रशिक्षित स्री पुरूष परिचारिका होत्या. दरवर्षी १००० प्रशिक्षिण केंद्रातून १०,०००बाहेर पडतात.म्हणजे आज पर्यंत १६लाख स्री पुरूष प्रशिक्षित परिचारिका भारतात आहेत. या मध्ये ए एन एम, जीएनएम,बीएस्सी, एमएसी,पिएचडी शिक्षण प्रशिक्षण झालेल्या आहेत.
महाराष्ट्र राज्यात सव्वा तीन लाख प्रशिक्षित परिचारिका सरकारी खाजगी क्षेत्रात कार्यरत आहेत.
चाळीस हजार प्रशिक्षित नर्सेस सार्वजनिक सरकारी क्षेत्रात महाराष्ट्र राज्यात आरोग्य सेवक, सेवीका, आधिपरीचारीका, परिसेवीका,पाठ्यनिर्देशक, व्याख्याता, प्राध्यापक, प्राचार्य पदावर कार्यरत आहेत.
आज या व्यवसायाचेही विज्ञानीकरण,
आधुनिकीकरण,जागतिकी करण झाले आहे.
या युगात मणुष्य जन्म हा रूग्णालयात नर्सच्या हतावरच होत आहे. आणि माणसाचा म्रुत्यु ही नर्सच्या हतावरच रूग्णालयात च होतात.
नर्स रोज च आनंदाने मनुष्य जीवनाचे स्वागत करत असते. दुखानी भरलेल्या मनाने नातेवाईकांना धिर देत म्रुत्यु झालेल्या रूग्णाला निरोप देत असते.
महाराष्ट्र राज्यात हा व्यावसाय असंघटीत असल्याने दुर्लक्षित आहे.८०च्या दशका पासून मध्यमवर्गीय या व्यवसायाकडे वळाल्या मुळे व्यावसायाचा दर्जा उंचावला आहे.
विकसनशील देशा बरोबरच विकशीत देशाच्या आरोग्य सेवेचा कणा हा पुर्ण पणे या नर्सेसच आहेत. भारत देशाच्या त्रिस्तरीय पंचायत राज मध्ये उत्कृष्ट कामगिरी या नर्सेसच करत आहेत. गाव पातळी पासून ते सुपरस्पेशालीटी रूग्णालया पर्यंत सर्व रूग्णालयाचे व्यवस्थापन या नर्सेसच सांभाळत आहेत. डाॅ फक्त प्रोशीजर करून व केस पेपरवर आदेश लिहून जातात. पण रूग्णाचे व रूग्णालयाचे व्यवस्थापन या नर्सेसच सांभाळत आहेत. डाॅ. वैद्यकिय सेवेचा मेंदू आहे आणि नर्सेस या वैद्यकीय सेवेचे ह्रदय आहेत हे मात्र नक्की. सध्या जगभर संसर्गजन्य कोरोना रोगाची साथ चालू आहे. सर्व जगभर डाॅ केसपेपर वर आदेश लिहून जात आहेत रोज डायरेक्ट आठ तास कोरोना रूग्णाची सेवा देण्याचे काम नर्सेस करत आहेत. हे योद्धे स्वतःचा संसार मुलं बाळ विसरून पिपिईचे कफन घालून मानव वशांचे कफन दूर करण्याचे काम करत आहेत. अनेक लोक कोरोना मुळे श्वसन संस्थेच्या आजाराने बिछान्यावर तडफडत आहेत याच नर्सेस शेवटच्या क्षणापर्यंत त्यांना प्राणवायु देवून प्राण वाचवण्याचे कामं करत आहेत.अंगावरचा सर्व साज फेकून देवून आघाडीवर लढायाचे काम करत आहेत. रूग्ण सेवेच्या दिव्यांच्या वाती होऊन स्वतः जळत आहेत आणि जगाला आरोग्य दायी प्रकाश देत आहेत.
जगातील एक मेव व्यावसाय जो भ्रष्टाचार मुक्त सेवा करनारा शाही व्यावसाय आहे. परंतु महाराष्ट्र राज्यात नर्सेस व्यावसाय अंधारात चाचपडत आहे. म्रुत्यु शी झुंज देणार्या माणसांना वाचवनारा व्यावसाय स्वतःच म्रुत्यु च्या बिछान्यावर पडून अंधारात चाचपडताना दिसतो आहे. आज महाराष्ट्र राज्यात नर्सेस साडेतीन लाख जरी असल्या तरी त्या आरोग्य शिक्षण, आरोग्य सेवा, रेल्वे, ईएसआय ,झेडपी, नगर पालिका, महानगरपालिका, पोलीस, खाजगी रूग्णालये अशा विभागल्या आहेत.महाराष्ट्र सरकारचे या कडे कसलेच लक्ष नाही. कारण महाराष्ट्र शासन यांना फक्त आणि फक्त पगार देते या व्यतिरिक्त नर्सिंग शिक्षण आणि व्यावसाय यांना राज्याच्या बजेट मध्ये शुन्य तरतूद आहे. मध्यम आणि गोरगरीब यांची मुलं बाळ हे शिक्षण घेत असत पण महाराष्ट्र सरकारने शिक्षणाचे बाजारी करण केले आणि सरकरी परिचारिका प्रशिक्षण महाविद्यालये शेवटचा श्वास घेत आहेत. स्वातंत्र्य मिळून ७५वर्षे झाली आजही प्रशिक्षण महाविद्यालयात प्राचार्य, प्राध्यापक, यांचे एकही पद निर्माण केलेले नाही. भारतीय परिचर्या परिषदेला खोटी प्रतिज्ञा पत्र देऊन काॅलेजेस चालवली जातात. तिच अवस्था आरोग्य विज्ञान विद्यापिठात आहे. या व्यवसायाला सर्व राज्यात स्वतंत्र संचालनालय आहेत महाराष्ट्र राज्यात नाही.
त्यामुळे महाराष्ट्र शासनाला नर्सेसचे खरे प्रश्न समजतं नाहीत.कोरोना मुळे अनेक नर्स पॉजिटिव आल्या, येत आहेत. काही म्रुत्यु ही झाले आहेत.आजही नर्सेस कोरोना शी लढन्या साठी दर्जेदार पिपिई किट मागत आहेत. आजही बर्याच रूग्णालयात नर्स नी कोरोनाची ड्युटी केल्यानंतर त्यांची राहायची सोय नाही म्हणून घरी येऊन जावुन करत आहेत. ड्युटीवर जेवायला नाही. नर्सेस नियुक्ती, बदली, बढती, प्रतिनियुक्तित या मध्ये प्रचंड भ्रष्टाचार केला जातो. विशेष म्हणजे याचं रेकाॅर्डच ठेवले जात नाही. या ठिकाणी देशभर स्री पुरूष भेदभाव केला जात नाही. पण महाराष्ट्र राज्यात सर्व काही अलबेल आहे. या ठिकाणी ३०% पुरूष आणि ७०%महिला घेतल्या जातात. हा व्यावसाय लोकशाहीतील मुका व्यावसाय आहे. मुकी बिचारी कशी ही हाका अशी अवस्था झाली आहे. खाजगी क्षेत्रात वैद्यकीय व्यावसायातून प्रचंड पैसा कमवला जातो पण नर्स अप्रशिक्षित असते. प्रशिक्षित असेल तर पगार ही रोजगार हमी कामगारा पेक्षा कमी दिला जातो.
राज्यातील सर्व नर्सेस सहा तास कडक उन्हातही पिपिई किट घालून ड्युटी करत आहेत.
कोरोना विषाणुचे दिड वर्षा पासुन थैमान घालत आहे.दिड वर्षापासून नर्सेस ना कसलीच सुट्टी दिली गेलेली नाही. सरकार नर्सेस चा उपयोग मशीन प्रमाणे करत आहे हे दुर्दैव. ज्यांना अत्यावश्यक परिस्थीतीनुसार सुट्टी घेतली त्यांचे वेतन बंद करण्यात आले.
नर्सेस ची क्वारंनटाईन रजा बंद करण्यात आली आहे.राज्य सरकार ने वर्ष भरात नर्सेस भरतीच्या वल्गना केल्या पण त्या फक्त घोषणाच होत्या. आयसीयु मध्ये नर्स आणि रूग्ण यांचे प्रमाण ठरलेले असते. हे प्रमाण योग्य नसल्यामुळेच कोरोना रूग्ण तडफडून मरत आहेत. आयसीयु मध्ये अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून नर्सेस चा छळ चालू आहे.अनेक नर्सेस चा उपयोग रूग्ण सेवे ऐवजी कारकूनी कामा साठी केला जात आहे.
सरकारी नर्सिंग काॅलेज मधील विद्यार्थ्यांवर ही अन्यायातून सुटलेले नाहीत. कोरोना रूग्ण सेवेसाठी नर्सिंग विद्यार्थी विना वेतन, विना विमा, वापरून घेतले जात आहे.अनेक विद्यार्थी पाॅजीटिव्ह आले आहेत. नर्सेस महाविद्यालयातील प्राचार्य, उप प्राचार्य व अध्यापक पदे स्वातंत्र्या नंतर ७५वर्षातही भरलेली नाहीत त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.नर्सेस हे कोराना विरूद्ध आघाडीवर लढनारे योध्दे आहेत यांनाच निर्णय प्रक्रियेत घेतलेले नाही.नर्सिंग बोर्ड चे तर बारा वाजलेले आहेत.रिटायर्ड कर्मचारी आणि उसनवारीवर बोर्ड चालू आहे.तिच अवस्था आरोग्य विज्ञान विद्यापिठ मध्ये आहे. आरोग्य विज्ञान विद्यापिठात विद्यार्थ्यांच्या उत्तर पत्रीका व्यवस्थीत तपासून विद्यार्थ्यांना न्याय मिळत नाही किती मोठी शोकांतिकाच आहे.सरकारचे लक्ष फक्त खंडणी, हप्ते, कमिशन, मिळनार्या खात्या कडेच आहे हे या महाराष्ट्र राज्याचे दुर्दैवच म्हणावे लागेल.भारत देशाच्या पंतप्रधानांनी ही नर्सेसच्या सेवेचे फोन करून कौतुक केलं आहे. आज कोरोना महामारी मुळे सगळे पळून गेलेत, डाॅ केसपेपरवर आदेश लिहून जात आहेत, राजकिय नेते देशातील, राज्यातील लोकांना म्हणजे मतदारांना खायला घालने, नेवून सोडने, घेवून येने, मिडीयात घोषणा करणे,पद उपभोगन्या साठी निवडणुका घेने,मिडीयात कोणी विरोधात लिहिले तर त्याचा गळा आवळने याच्यात व्यस्त आहेत. पोलीस रस्त्यावर तर नर्स रोज आठ तास रूग्णाजवळ कोरोनासी लढत आहेत. नर्स आणि आरोग्य सेवा यांच्या कडे केलेले दुर्लक्ष एक दिवस मानव वंश बुडवल्या शिवाय रहाणार नाही हे सर्व जगाला कळून चुकलं आहे. कळतय पण वळत नाही असं केले तर त्या देशाच्या आरोग्य सेवेचे बारा वाजणार आहेत.कारण येथून पुढे निसर्ग मानव वंश नियंत्रीत करण्याचा वांर वांर प्रयत्न करणार आहे.
१२मे या जागतिक परिचारिका दिना निमित्त माझ्या जगभरातील देशातील व राज्यातील शहीद झालेल्या नर्सेसना भावपूर्ण आदरांजली. सर्वच नर्सेस आघाडी वर लढत आहेत त्यांना माझा सलाम व आंतर राष्ट्रीय नर्सेस दिनानिमीत्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा.फ्लोरेन्स नाईंटीगेल यांनी लावलेला हा दिवा असाच तेवत रहावो व लोकांना आरोग्य सेवेचा प्रकाश मिळत रहावो. जय महाराष्ट्र, जय भारत.💊💊💊💊💊💊💊💊💊💊💊💊💊💊💊💊💊💊💊💊💊💊

नागपूर, सामाजिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *